जर्मनीने करोनाबाबतचे अनेक निर्णय वेळेत घेतल्यामुळे ही लढाई आटोक्यात आल्याचं जाणवतंय. कदाचित एक ‘रिसर्च सायंटिस्ट’ महिला देशाच्या प्रमुख पदावर असण्याचा हा फायदा असावा!

येऊ घातलेल्या अपरिहार्य आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी जर्मनीमध्ये अनेक उपाययोजना करण्यात आल्या. कंपन्यांनी त्यांच्या बहुतेक कर्मचाऱ्यांचे कामकाजाचे तास कमी करून कोणालाही कामावरून काढून टाकलं नाही. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराचं आर्थिक ओझं पेलणं शक्य झालं. बालसंगोपनामुळे काम करण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांना दीर्घ कालावधीसाठी सरकारकडून पैसे मिळणार आहेत.......